
वॉशिंग्टन , 10 एप्रिल (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून होर्मुज जलडमरूमध्य मार्गे होणाऱ्या तेल वाहतुकीत अडथळे निर्माण केल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, या प्रकरणात इराण अतिशय वाईट काम करत आहे आणि हे वर्तन अशोभनीय आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले, “इराण होर्मुज जलडमरूमधून तेल जाऊ देण्याच्या बाबतीत अतिशय वाईट काम करत आहे. काही लोक याला अशोभनीय म्हणतील. हा तो करार नाही जो आपण केला होता.” डोनाल्ड ट्रम्प यांची ही टिप्पणी तेल टँकरांकडून शुल्क आकारल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर आली आहे. यापूर्वीही त्यांनी ट्विट करून म्हटले होते की, इराण होर्मुज जलडमरूमधून जाणाऱ्या टँकरांकडून शुल्क घेत असल्याच्या बातम्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले, “त्यांनी असे करू नये आणि जर करत असतील, तर त्वरित थांबवावे.”
व्हाईट हाऊस ने सांगितले की, युद्धविराम कराराचा एक भाग म्हणून होर्मुज जलडमरूम पुन्हा सुरू करण्याला त्यांचा पाठिंबा आहे. मात्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराणच्या लष्करी दलाचा विरोध करतात, कारण ते अजूनही या जलमार्गावर नियंत्रण ठेवून जाणाऱ्या जहाजांकडून टोल वसूल करून महसूल वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
युद्धविरामाची घोषणा करत दोन्ही देश विजयाचा दावा करत असले, तरी इराण आणि अमेरिका एकमेकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. इराणच्या अर्ध-सरकारी वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणी सैन्याने होर्मुज जलडमरूमध्ये बारूदी सुरंग (माइन्स) पेरल्या आहेत. हा मार्ग जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, तेहरानने तो बंद केल्याचे सांगितले जाते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, इराणने कराराचे पालन केले नाही, तर अमेरिकन सैन्य यापूर्वीपेक्षा अधिक कठोर कारवाई करेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode