एसुसने नागपुरात सुरू केले नवीन एक्सक्लुझिव्ह स्टोअर
कंपनीने दिली पॅन-इंडिया रिटेल स्ट्रॅटेजीला बळकटी नागपूर, 11 एप्रिल (हिं.स.) : तायवानस्थित जागतिक तंत्रज्ञान कंपनी एसुस इंडियाने भारतातील आपले रिटेल नेटवर्क अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत नागपूरमध्ये नवीन एक्सक्लुझिव्ह स्टोअर
एसुसने नागपुरात सुरू केले नवीन एक्सक्लुझिव्ह स्टोअर


कंपनीने दिली पॅन-इंडिया रिटेल स्ट्रॅटेजीला बळकटी

नागपूर, 11 एप्रिल (हिं.स.) : तायवानस्थित जागतिक तंत्रज्ञान कंपनी एसुस इंडियाने भारतातील आपले रिटेल नेटवर्क अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत नागपूरमध्ये नवीन एक्सक्लुझिव्ह स्टोअर सुरू केले आहे.

नागपूरच्या गणेशपेठ कॉलनीतील मॉडेल मिल कंपाऊंड येथील आनंदम वर्ल्ड सिटीमध्ये हे नवीन स्टोअर सुरू करण्यात आले आहे.सुमारे 250 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या या स्टोअरमध्ये ग्राहकांना एसुसची विविध उत्पादने एकाच ठिकाणी अनुभवता आणि खरेदी करता येणार आहेत.या स्टोअरमध्ये विवोबुक, झेनबुक, रिपब्लिक ऑफ गेमर्स (ROG) लॅपटॉप्स, गेमिंग डेस्कटॉप्स, ऑल-इन-वन पीसी आणि विविध ऍक्सेसरीज यांसारख्या उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. या उद्घाटनासह नागपूरमध्ये एसुसचे हे चौथे एक्सक्लुझिव्ह स्टोअर ठरले आहे.

स्टोअरचे औपचारिक उद्घाटन एसुसचे उपाध्यक्ष अर्नोल्ड सु यांच्या हस्ते करण्यात आले. या विस्ताराबाबत बोलताना अर्नोल्ड सु म्हणाले की,“भारतामध्ये आमची रिटेल उपस्थिती वाढवत असल्याचा आम्हाला आनंद आहे. महाराष्ट्र हा आमच्यासाठी महत्त्वाचा बाजार आहे. नागपूरमधील हे नवीन स्टोअर ग्राहकांना आमच्या नवीन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. आमच्या रणनीतिक रिटेल विस्तारातून आम्ही ग्राहकांशी अधिक जवळीक साधत नवीन टचपॉइंट्स निर्माण करत राहू.”या नव्या स्टोअरमुळे नागपूरमधील ग्राहकांना प्रगत तंत्रज्ञानाचा थेट अनुभव मिळणार असून शहरातील डिजिटल रिटेल क्षेत्रालाही नवी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार /सुधांशु जोशी

 rajesh pande