सेबीकडून तीन आधुनिक आयटी प्लॅटफॉर्म लाँच
नवी दिल्ली, 11 एप्रिल (हिं.स.)। भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड (सेबी)ने देशातील व्यवसाय सुलभ करण्यासाठी आणि सायबर सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तीन अत्याधुनिक आयटी प्लॅटफॉर्म लाँच केले आहेत. सेबीकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, या
sebi


नवी दिल्ली, 11 एप्रिल (हिं.स.)। भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड (सेबी)ने देशातील व्यवसाय सुलभ करण्यासाठी आणि सायबर सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तीन अत्याधुनिक आयटी प्लॅटफॉर्म लाँच केले आहेत. सेबीकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, या डिजिटल उपक्रमांमध्ये ‘सपकॉम्स’, ‘ई-अॅडज्युडिकेशन पोर्टल’ आणि ‘सी-सॅक’ यांचा समावेश आहे. या तिन्ही प्लॅटफॉर्मचा उद्देश बाजारातील नियम अधिक सोपे करणे, संवाद प्रक्रिया सुव्यवस्थित करणे आणि न्यायिक कार्यवाही पूर्णपणे डिजिटल स्वरूपात आणणे हा आहे.

‘सपकॉम्स’ म्हणजेच सिंगल युनिव्हर्सल प्लॅटफॉर्म फॉर कम्युनिकेशन्स हा सेबीचा एक एकत्रित प्लॅटफॉर्म असून, तो पारंपरिक ई-मेल आधारित संवादाची जागा घेणार आहे. या प्लॅटफॉर्ममुळे सेबी आणि इतर संस्थांमधील सर्व अधिकृत संवाद एका सुरक्षित आणि केंद्रीकृत ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. यामुळे संस्थात्मक माहितीचा एक मजबूत डेटा बँक तयार होईल. भविष्यात संवादातील तुटलेले दुवे किंवा रिप्लाय चेनमधील अडचणी टाळता येतील आणि प्रत्येक संवादाचा स्पष्ट ऑडिट ट्रेल उपलब्ध राहील.

दुसरा प्लॅटफॉर्म म्हणजे ‘ई-अॅडज्युडिकेशन पोर्टल’ असून, हा एक अत्याधुनिक डिजिटल मंच आहे. याच्या मदतीने अर्ध-न्यायिक प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहेत. या पोर्टलद्वारे संबंधित पक्षांना कारण दाखवा नोटीस डाउनलोड करता येतील, त्यावर उत्तर सादर करता येईल तसेच ऑनलाइन हिअरिंग मॉड्यूलद्वारे डिजिटल सुनावणीत सहभागी होता येईल. यामुळे न्यायिक प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ आणि पारदर्शक होणार आहे.

तिसरा प्लॅटफॉर्म ‘सी-सॅक’ म्हणजे सायबर-सेक ऑडिट कंप्लायंस ही कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रगत प्रणाली आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सेबीद्वारे नियंत्रित संस्थांच्या सायबर सुरक्षेवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. या प्रणालीद्वारे संस्थांकडून सादर करण्यात येणाऱ्या सायबर ऑडिट रिपोर्टचे एआयच्या मदतीने विश्लेषण केले जाईल. त्यातून सुरक्षेतील त्रुटी, संभाव्य धोके ओळखले जातील आणि संबंधित कंपन्यांना रिस्क स्कोर दिला जाईल. यामुळे सेबीला डेटा-आधारित आणि जलद निर्णय घेणे अधिक सुलभ होणार आहे.

सेबीने उचललेले हे तांत्रिक पाऊल भारतीय शेअर बाजाराच्या रेग्युलेटरी इकोसिस्टमला अधिक आधुनिक बनवणारे ठरणार असून, वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापराच्या पार्श्वभूमीवर सायबर धोक्यांशी प्रभावीपणे सामना करण्यासाठी हे एक महत्त्वाचे टप्पे ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande