आयपीएल 2026 : राजस्थान रॉयल्सचा विजयी चौकार
गुवाहाटी, 11 एप्रिल (हिं.स.)ध्रुव जुरेल (८१*) आणि वैभव सूर्यवंशी (७८) यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प
वैभव सूर्यवंशी


गुवाहाटी, 11 एप्रिल (हिं.स.)ध्रुव जुरेल (८१*) आणि वैभव सूर्यवंशी (७८) यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, कर्णधार रजत पाटीदारच्या ६३ धावांच्या खेळीच्या जोरावर बंगळुरुने २० षटकांत आठ गडी गमावून २०१ धावा केल्या. बंगळुरुवे ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने अवघ्या १८ षटकांत चार गडी गमावून २०२ धावा करत विजय निश्चित केला.या हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा हा पहिला पराभव आहे. यापूर्वीचे दोन्ही सामने संघाने जिंकले होते.

दरम्यान, राजस्थानने सलग चार सामन्यांमध्ये प्रभावी विजय नोंदवले आहेत. सध्या, हा संघ +२.०५५ च्या नेट रन रेटसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. बंगळुरु सध्या चार गुण आणि +१.२३१ च्या नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानने आयपीएलमध्ये पाचव्यांदा २०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य पूर्ण केले आहे. या बाबतीत पंजाब किंग्स आघाडीवर असून, त्यांनी नऊ वेळा ही कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्स सहा वेळा ही कामगिरी करून दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये २०० पेक्षा जास्त धावांचा बचाव करताना आरसीबीचा हा सातवा पराभव आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande