
- नातं जनाईने दिली माहिती
मुंबई, १२ एप्रिल (हिं.स.) : बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांची प्रकृती शनिवारी रात्री अचानक खालावली. त्यामुळे त्यांना तातडीनं मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सध्या त्यांच्यावर 'आपत्कालीन वैद्यकीय विभागात' उपचार सुरू असल्याची माहिती त्यांची नात जनाई भोसले हिनं दिली आहे.
सुरुवातीला या बहुआयामी गायिकेला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता त्यांच्या नातीनं पोस्ट करुन त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचं खरं कारण सांगितलं आहे. दरम्यान, सध्या आशा भोसले यांच्यावर 'आपत्कालीन वैद्यकीय विभागात' उपचार सुरू असून त्यांची नात जनाई भोसले हिनं आपल्या आजीच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
नात जनाई भोसले हिनं स्पष्ट केलंय की, खूप अशक्तपणा आणि चेस्ट इन्फेक्शन झाल्यामुळे तिची आजी गायिका आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. तिनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, माझी आजी, आशा भोसले, यांना अशक्तपणा आणि चेस्ट इन्फेक्शन झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आम्ही विनंती करतो की, तुम्ही आमच्या गोपनीयतेचा आदर करावा. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि सर्व काही ठीक होईल, अशी आम्हाला आशा आहे. आम्ही लवकरच त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील माहिती देऊ...
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी