अजित दादांच्या जनसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी मी पोटनिवडणुकीत उभी - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
पुणे, 12 एप्रिल (हिं.स.) - आदरणीय अजितदादा आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि आशीर्वाद सदैव आपल्यासोबत आहेत. दादांनी शेवटच्या क्षणापर्यंत जनतेसाठी काम केले, जात-धर्माच्या पलीकडे जाऊन लोकविकासाची कामे केली. त्यांनी कठीण प्रसंगी ठाम निर्णय घेण्याच
Ndjs


पुणे, 12 एप्रिल (हिं.स.) - आदरणीय अजितदादा आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि आशीर्वाद सदैव आपल्यासोबत आहेत. दादांनी शेवटच्या क्षणापर्यंत जनतेसाठी काम केले, जात-धर्माच्या पलीकडे जाऊन लोकविकासाची कामे केली. त्यांनी कठीण प्रसंगी ठाम निर्णय घेण्याची ताकद दाखवली. ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांमधून त्यांनी सर्वसामान्यांना, भगिनींना आधार दिला. अजित दादांसारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे कठीण आहे; त्यांच्या जनसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी मी या पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून उभी आहे, असे भावनिक आवाहन उपमुख्यमंत्री तथा बारामती पोटनिवडणुकीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज २०१ बारामती विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा शुभारंभ श्री क्षेत्र कन्हेरी इथून केला. यावेळी श्री मारुतीरायाचे दर्शन घेऊन पुढे बारामतीकरांशी सुसंवाद साधला. मारुतीरायाचे कृपाशीर्वाद आणि तुम्हा सर्वांची साथ ही भावना मला बळ देणारी आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महायुतीतील विविध पक्षांचे मान्यवर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते; त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल तसेच इतर पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले.

त्या पुढे म्हणाल्या की, ही निवडणूक केवळ माझी एकटीची नसून बारामतीकरांच्या विश्वासाची, विकासाची आणि आपल्या एकत्रित भविष्यासाठीची आहे. ही निवडणूक लोकशाहीची आहे. प्रत्येक मताचा मी आदर करते. आदरणीय दादांनी आयुष्यभर जनतेसाठी केलेल्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यासह आपल्या सर्वांवर आहे. जात, धर्म यापलीकडे जाऊन सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी व्यवस्थापन, उद्योग-व्यवसाय वाढ, रोजगारनिर्मिती, शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत बारामतीला अधिक सक्षम आणि विकसित करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाची ताकद आहे. त्यांच्या सन्मान आणि सहभागासहच पुढील वाटचाल होईल, याची मी खात्री देते. कार्यकर्त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन काम केले जाईल. प्रतिभावान कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देणारे वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने पावलं टाकली जातील.

दादांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आणि बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे, येत्या २३ एप्रिल रोजी ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटण दाबून आशीर्वादरुपी तुमची मते मला मोठ्या संख्येने द्यावीत, अशी भावना बारामतीकरांकडे व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande