आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत पंतप्रधानांकडून तीव्र चिंता व्यक्त
पंतप्रधानांकडून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि जलद उपचारांसाठी प्रार्थना नवी दिल्ली, 12 एप्रिल (हिं.स.)। आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आशा भोसले यांन
PM Expresses Deep Concern Over Asha Bhosle Health


पंतप्रधानांकडून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि जलद उपचारांसाठी प्रार्थना

नवी दिल्ली, 12 एप्रिल (हिं.स.)। आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आशा भोसले यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे.

पंतप्रधानांनी 'एक्स या सामाजिक माध्यमांवरील एका संदेशात म्हटले आहे की, आशा भोसले जी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे ऐकून मला तीव्र चिंता वाटत आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी मी प्रार्थना करतो.

दरम्यान, गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आशा भोसले यांनी त्यांच्यासाठी एक खास व्हिडिओ मेसेज रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी पंतप्रधानांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना सांगितले होते की, एवढ्या मोठ्या देशाची जबाबदारी सांभाळणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांचा अनुशासन त्यांना विशेष आवडतो. त्या म्हणाल्या होत्या की, पंतप्रधान मोदी रोज पहाटे ४ वाजता उठून योग करतात आणि त्यांच्या तोंडून कधीही कोणाबद्दल वाईट बोलणे ऐकायला मिळत नाही.

त्यांनी पुढे असेही नमूद केले होते की, नरेंद्र मोदी हे अतिशय दयाळू व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या भाषणांमध्ये ते लोकांना हसवतात, कविता सादर करतात आणि हलक्या-फुलक्या शैलीत संवाद साधतात. इतरांच्या वाईट वागणुकीवरही ते हसून प्रतिसाद देतात, ही मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांनी देवाकडे प्रार्थना करत पंतप्रधानांना दीर्घायुष्य लाभावे आणि ते असेच देशाची सेवा करत राहावेत, अशी भावना व्यक्त केली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande