आशाताईंची गाणी सदैव लोकांच्या आयुष्यात गुंजत राहतील - पंतप्रधान
मुंबई, 12 एप्रिल (हिं.स.) - ख्यातनाम गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्
मोदी शाह


मुंबई, 12 एप्रिल (हिं.स.) - ख्यातनाम गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण संगीत रचनांपर्यंत, त्यांच्या आवाजात कालातीत तेज होते. त्यांच्याशी झालेल्या संवादांच्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन.

त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना माझ्या भावपूर्ण संवेदना. त्या पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी सदैव लोकांच्या आयुष्यात गुंजत राहतील.

000000000

ईश्वर आशाजींना आपल्या दिव्य चरणी स्थान देवो - अमित शाह

आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आणि विशेषतः माझ्यासारख्या प्रत्येक संगीतप्रेमीसाठी अत्यंत दुःखद आहे; कारण आपल्या सर्वांच्या लाडक्या आशा भोसलेजी आता आपल्यात राहिल्या नाहीत. आशाताईंनी केवळ आपल्या सुमधुर आवाजातून आणि अजोड प्रतिभेतून स्वतःची एक वेगळी ओळखच निर्माण केली नाही, तर आपल्या सुरांनी त्यांनी भारतीय संगीताची समृद्धीही अधिकच वाढवली.

संगीताच्या प्रत्येक शैलीशी एकरूप होण्याची त्यांची अद्वितीय क्षमता, त्यांचे गाणे ऐकणाऱ्या प्रत्येकाचे मन जिंकण्यात कधीच अपयशी ठरली नाही. आपल्या आवाजातून लक्षावधी लोकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या आशाजींनी हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ आणि गुजराती यांसारख्या अनेक भाषांमध्ये, तसेच लोकसंगीताच्या क्षेत्रातही आपली एक अमिट छाप उमटवली आहे. आशाताईंच्या आवाजात जितका मृदूपणा होता, तितकीच साधेपणा आणि आपुलकी त्यांच्या स्वभावातही होती. जेव्हा जेव्हा मला त्यांना भेटण्याचा बहुमान लाभला, तेव्हा आमच्यात विविध विषयांवर विशेषतः संगीत आणि कला क्षेत्रावर दीर्घ चर्चा होत असत.

आज त्या जरी आपल्यात प्रत्यक्ष उपस्थित नसल्या, तरी त्यांचा आवाज मात्र आपल्या हृदयांत सदैव जिवंत राहील. ईश्वर आशाजींना आपल्या दिव्य चरणी स्थान देवो. मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांप्रती माझ्या मनापासूनच्या संवेदना व्यक्त करतो.

ॐ शांती, शांती, शांती.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande