प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती - उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला शोक
नवी दिल्ली, 12 एप्रिल (हिं.स.)। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. राष्ट्रपतींनी आपल्या एक्स पोस्ट वरील शोकसंदेशात म्हटले की, आशा भोसले जी या
President and Vice President


नवी दिल्ली, 12 एप्रिल (हिं.स.)। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

राष्ट्रपतींनी आपल्या एक्स पोस्ट वरील शोकसंदेशात म्हटले की, आशा भोसले जी यांच्या निधनामुळे संगीतविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक दिग्गज गायिका म्हणून त्यांच्या देदीप्यमान कारकिर्दीने भारतातील संगीताचा एक संपूर्ण कालखंडच परिभाषित केला आहे. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधल्याच्या माझ्या अनेक सुखद आठवणी आहेत.

पुढे त्या म्हणाल्या की, एक कलाकार आणि एक व्यक्ती म्हणून, त्यांनी आपले आयुष्य आपल्या स्वतःच्या अटींवर जगले. आपल्या सुमधुर आणि कालातीत आवाजाने त्यांनी अनेक दशके भारतीय संगीताला समृद्ध केले. त्यांचे संगीत सदैव अजरामर राहील. त्यांचे निधन ही संगीतप्रेमींसाठी कधीही भरून न येणारी हानी आहे. मी त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करते.

उपराष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, प्रख्यात गायिका आशा भोसले जी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला अत्यंत दुःख झाले. त्यांचे कुटुंबीय, चाहते आणि संगीतप्रेमींप्रती माझ्या संवेदना आहेत. आपल्याला लाभलेल्या अष्टपैलू आवाजाच्या देणगीमुळे आशाजींना अनेक गायन प्रकार हाताळता आले, भावपूर्ण गझल आणि पारंपारिक भजनांवर प्रभुत्व मिळवता आले, त्यांनी भारतीय संगीतजगतावर आपली अमिट छाप सोडली आहे. त्यांचा अजरामर आवाज आणि सांगीतिक वारसा कोट्यवधी लोकांच्या हृदयात रुंजी घालत राहील आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. ओम शांती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande