बेंगळुरू आणि मुंबई दरम्यान सुरू होणार नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन
नवी दिल्ली, 12 एप्रिल (हिं.स.)। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बेंगळुरू आणि मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. रेल्वेमंत्र्यांनी खासदार पी. सी. मोहन यांना यासाठी मिळालेल्या मंजुरीची माहिती पत्राद्वारे दिली आहे.
Vande Bharat Sleeper Train Bengaluru Mumbai


नवी दिल्ली, 12 एप्रिल (हिं.स.)। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बेंगळुरू आणि मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

रेल्वेमंत्र्यांनी खासदार पी. सी. मोहन यांना यासाठी मिळालेल्या मंजुरीची माहिती पत्राद्वारे दिली आहे. पत्रात नमूद करण्यात आले आहे की, कर्नाटकातील केएसआर बेंगळुरू स्टेशन येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईपर्यंत वंदे भारत स्लीपर ट्रेन चालविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

ही नवीन रेल्वे सेवा पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे दक्षिण आणि पश्चिम भारतामधील संपर्क अधिक दृढ होईल. तसेच, आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या स्लीपर कोचमध्ये प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande