दिल्लीमध्ये होणार ‘संघ गंगेचे तीन भगीरथ’ नाटकाचे सादरीकरण
नवी दिल्ली, १३ एप्रिल (हि.स.) । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये १५, १८ आणि १९ एप्रिल २०२६ रोजी तीन वेगवेगळ्या ठिकाणी ‘संघ गंगेचे तीन भगीरथ’ या विशेष हिंदी नाटकाचे सादरीकरण केले जाणार आहे. नाटकाचे दिग्दर्शक संजय
‘संघ गंगा के तीन भगीरथ’ नाटक का लोगो


नवी दिल्ली, १३ एप्रिल (हि.स.) । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये १५, १८ आणि १९ एप्रिल २०२६ रोजी तीन वेगवेगळ्या ठिकाणी ‘संघ गंगेचे तीन भगीरथ’ या विशेष हिंदी नाटकाचे सादरीकरण केले जाणार आहे. नाटकाचे दिग्दर्शक संजय पेंडसे यांनी ही माहिती दिली.

संजय पेंडसे यांच्या मते, संघाच्या १०० वर्षांच्या पूर्णत्वानिमित्त संपूर्ण देशभर या नाटकाचे सादरीकरण होत आहे. ‘संघ गंगेचे तीन भगीरथ’ हे नाटक संघाचे पहिले तीन सरसंघचालक—डॉ. केशव बलिराम हेडगेवार, श्री गुरुजी (एम. एस. गोलवलकर) आणि बालासाहेब देवरस—यांच्या जीवनावर आणि त्यांच्या योगदानावर आधारित आहे. या नाटकाद्वारे संघाची शंभर वर्षांची वाटचाल जिवंत स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दिल्लीतील पहिले सादरीकरण १५ एप्रिल, बुधवार रोजी ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (कॅट) यांच्या वतीने आयोजित केले जाणार आहे. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बालकृष्ण भरतिया यांनी सांगितले की, हे सादरीकरण नवी दिल्लीतील संसद मार्गावरील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटर येथे सायंकाळी ५ वाजता होईल. या नाटकाचे लेखन श्रीधर गाडगे यांनी केले आहे. ही प्रस्तुती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना, त्याची उद्दिष्टे, सामाजिक कार्य आणि विकासाची वाटचाल यांचे दर्शन घडवते. यात राष्ट्रवाद, सामाजिक समरसता आणि संघटनेच्या १०० वर्षांच्या संघर्ष व विस्तारावर विशेष भर देण्यात आला आहे.

त्यानंतर १८ एप्रिल, शनिवार रोजी दुपारी ३ वाजता मयूर विहार येथील महाराजा अग्रसेन महाविद्यालय (वसुंधरा एन्क्लेव) येथे नाटकाचे दुसरे सादरीकरण होईल. याबाबत संघाचे दिल्ली पूर्व विभाग संघचालक वीरेश कुमार यांनी माहिती दिली. तसेच केशव पुरम विभागाचे संघचालक विरेंद्र नागपाल यांनी सांगितले की, तिसरे आणि अंतिम सादरीकरण १९ एप्रिल, रविवार रोजी सायंकाळी ६ वाजता श्यामा प्रसाद मुखर्जी महाविद्यालय, नॉर्थ एव्हेन्यू (वेस्ट पंजाबी बाग) येथे होईल.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande