खरातच्या मालमत्तेवरती ईडीचे छापे, संशयास्पद कागदपत्र जप्त
नाशिक, 13 एप्रिल (हिं.स.)। - धर्माच्या नावावरती महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात वर अखेर सोमवारी ईडीने छापे टाकले यामध्ये अनेक गैरव्यवहार तसेच नको त्या मार्गाने पैसा मिळविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ईडी कडून याबाबत लवकरच अधिकृतरित्
खरातच्या मालमत्तेवरती ईडीचे छापे, संशयास्पद कागदपत्र जप्त


नाशिक, 13 एप्रिल (हिं.स.)।

- धर्माच्या नावावरती महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात वर अखेर सोमवारी ईडीने छापे टाकले यामध्ये अनेक गैरव्यवहार तसेच नको त्या मार्गाने पैसा मिळविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ईडी कडून याबाबत लवकरच अधिकृतरित्या माहिती दिली जाणार आहे.

नाशिक शहरात मागील महिन्यात 18 मार्च रोजी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुदगल यांनी धर्माच्या नावावर ती महिला व बायकांचे लैंगिक शोषण करणे तसेच आर्थिक फसवणूक करणे यासह विविध कारणांमुळे अशोक खरात याच्या गोविंद नगर जवळील कर्मयोगी नगर या ठिकाणी पहाटेच्या सुमारास घरात चोर शिरल्याचे नाटक करून छापा टाकला होता त्यात मध्ये अशोक खरात याला अटक करण्यात आली होती. भोंदू खरात विरोधात एका महिलेने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाकडून अधिकृतरित्या सांगण्यात आले होते त्यानंतर सर्वसाधारण सहा गुन्हे हे नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले होते.

या सर्व प्रकरणाचा तपास नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून केला जात असताना आठ दिवसानंतर याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती म्हणजेच या एसआयटी पथकाच्या प्रमुख पदी सौ. सातपुते या महिला आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर त्यांनी यात गुन्ह्याचा तपासाला गती दिली. त्यानंतर शिर्डी नाशिक सह काही भागांमध्ये खरात विरोधात आर्थिक फसवणूक व लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल झाले होते या सर्व गुणांचा तपास एसटी मार्फत सुरू आहे.

हे सर्व सुरू असताना दुसऱ्या बाजूला या प्रकरणाची दखल इडी तसेच इतर तपास पथकांनी देखील घेतली आणि त्याबाबतची माहिती राज्य सरकारने स्थापन केलेल्या एसआयटी पथकाकडून घेण्यात आली आणि स्वतः मागील आठवड्यामध्ये एसआयटीचे एक पथक नाशिक मध्ये दाखल झालेले होते या पथकाने देखील तपास करून कागदपत्र गोळा केली होती त्यानंतर सोमवारी 13 एप्रिल रोजी सकाळी भोंदू खरात च्या सिन्नर येथील आश्रमावर तसेच कर्मयोगी नगर येथील घरावरती ईडिने छापा टाकला अनेक प्रकारे कागदपत्रांची तपासणी करून गैरव्यवहार आणि मोठ्या प्रमाणावर रकमेची उलाढाल झालेली असल्याचे कागदपत्र जप्त केली असून याबाबतची अधिकृत घोषणा ईडी कडून अधिकृतरित्या करण्यात येणार आहे. यासह संबंधित असलेल्या 11 ठिकाणावरती देखील

ईडी कडून छापा टाकून कागदपत्र तसेच मालमत्तांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande