गुजरातमध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना ट्रकने चिरडले, सात जणांचा मृत्यू
गांधीनगर, 13 एप्रिल (हिं.स.)। गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात सोमवारी पहाटे एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अपघात घडला. लखतर-विरमगाम हायवेवर पायी चालत जाणाऱ्या भाविकांना बेदरकारपणे धावणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात सात जणांचा जागीच मृत
Horrific Accident Surendranagar Gujarat


गांधीनगर, 13 एप्रिल (हिं.स.)। गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात सोमवारी पहाटे एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अपघात घडला. लखतर-विरमगाम हायवेवर पायी चालत जाणाऱ्या भाविकांना बेदरकारपणे धावणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

ही घटना लखतर तालुक्यातील भास्करपारा गावाजवळ पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकोटहून काही भाविकांचा गट बहुचराजी मंदिर येथे दर्शनासाठी पायी निघाला होता. हे भाविक रस्त्याच्या कडेला चालत असताना मागून अतिवेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात सहा भाविक आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरचा चालक अशा एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.

लखतर पोलीस निरीक्षक योगेश पटेल यांनी सांगितले की, हा अपघात ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला असावा. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून भाविकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande