
नवी दिल्ली, 13 एप्रिल (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटर मॅग्यार आणि 'तिस्झा पक्षा'चे, हंगेरी मधील निवडणुकीत भरघोस यश मिळवल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले.
भारत आणि हंगेरी हे घनिष्ठ मैत्री, सामायिक मूल्ये आणि परस्परांप्रती असलेल्या निरंतर आदरभावनेने जोडलेले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दोन्ही प्रदेशांमधील लोकांच्या सामायिक समृद्धी आणि क्षेमकल्याणाकरता, उभय देशांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तसेच भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील महत्त्वपूर्ण धोरणात्मक भागीदारीला चालना देण्यासाठी मॅग्यार यांच्यासोबत जवळून काम करण्यास आपण उत्सुक आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे: निवडणुकीतील घवघवीत यशाबद्दल पीटर मॅग्यार आणि तिस्झा पक्षाचे हार्दिक अभिनंदन. भारत आणि हंगेरी हे घनिष्ठ मैत्री, सामायिक मूल्ये आणि परस्परांप्रती असलेल्या निरंतर आदरभावनेने जोडलेले आहेत. दोन्ही प्रदेशांमधील लोकांच्या सामायिक समृद्धी आणि क्षेमकल्याणाकरता उभय देशांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तसेच भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील महत्त्वपूर्ण धोरणात्मक भागीदारीला चालना देण्यासाठी आपण तुमच्या सोबत काम करण्यास उत्सुक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule