वारीची कार्यक्रम पत्रिका, पालखी सोहळा मुक्कामाचे वेळापत्रक 1 मे ला होणार जाहीर
पुणे, 13 एप्रिल (हिं.स.)संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यातील पुण्यातील भवानी पेठेतील मुक्कामाबाबतचा निर्णय आता वैशाख शुद्ध दशमी पंढरपूर येथील बैठकीनंतर घेतला जाणार आहे. त्यानंतर १ मे ला वारीची कार्यक्रम पत्रिका तसेच पालखी सोहळा मुक्काम
Alandi wari


पुणे, 13 एप्रिल (हिं.स.)संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यातील पुण्यातील भवानी पेठेतील मुक्कामाबाबतचा निर्णय आता वैशाख शुद्ध दशमी पंढरपूर येथील बैठकीनंतर घेतला जाणार आहे. त्यानंतर १ मे ला वारीची कार्यक्रम पत्रिका तसेच पालखी सोहळा मुक्कामाचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याची माहिती आळंदी देवस्थानने पत्रकाद्वारे दिली.

आळंदी देवस्थानने काढलेल्या पत्रकावर सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज कबीर, ॲड. रोहिणी पवार आणि पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मात्र, अद्याप पुण्यातील भवानी पेठ पालखी विठोबा मंदिरातील सोयी-सुविधांबाबत अधिकृत प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. परिणामी आळंदी देवस्थानला पालखी सोहळा समाजाला कोणतीही खात्री पुण्यातील मुक्कामाबाबत देता येणार नाही. वास्तविक ९ व १० जुलैच्या भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर मुक्कामाबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी, भवानीपेठ पालखी विठ्ठल मंदिराचे विश्वस्त यांच्याशी पालखीतळ मुक्कामातील सुविधा आणि उपाययोजनांबाबत सोहळ्याच्या वतीने आलेल्या सूचना तसेच त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष भेटीदरम्यान कळवल्या होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande