आय-पॅकचे सह-संस्थापक विनेश चंदेल यांना 10 दिवसांची ईडी कोठडी
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सीबीआय न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय नवी दिल्ली, 14 एप्रिल (हिं.स.) : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू येथील विशेष सीबीआय न्यायालयाने आय-पॅकचे सह-संस्थापक आणि संचालक विनेश चंदेल यांना 10 दिवसांची ईडी कोठडी
आय-पॅकचे सह-संस्थापक आणि संचालक विनेश चंदेल


मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सीबीआय न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली, 14 एप्रिल (हिं.स.) : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू येथील विशेष सीबीआय न्यायालयाने आय-पॅकचे सह-संस्थापक आणि संचालक विनेश चंदेल यांना 10 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. हा निर्णय बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर आला असून, कोळसा घोटाळ्याशी संबंधित तपासाचा हा भाग आहे.

केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी उशिरा संध्याकाळी चौकशी चंदेल यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना तत्काळ पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्यांना10 दिवसांच्या कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. हे संपूर्ण प्रकरणी पश्चिम बंगालमधील कोळसा घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचे आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हा गुन्हा नोव्हेंबर 2020 मध्ये सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरवर आधारित आहे. या प्रकरणात पश्चिम बंगालमधील आसनसोल परिसरातील ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या खाणीतून कोट्यवधी रुपयांच्या कोळशाची चोरी आणि तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा भंडाफोड झाला होता. ईडीच्या दाव्यानुसार, या रॅकेटशी संबंधित एका हवाला ऑपरेटरने आय-पॅकच्या इंडियन पीएसी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे कोट्यवधी रुपये हस्तांतरित केले होते. या व्यवहारांमुळे मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावरून पुढील कारवाई करण्यात आली आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande