उत्तर प्रदेशचे माजी मुख्य सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी घेतला नाशिक सिंहस्थ तयारीचा आढावा
नाशिक, 14 एप्रिल (हिं.स.)उत्तर प्रदेशचे माजी मुख्य सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी नाशिक येथील स्मार्ट सिटी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक मनपा आयुक्त
Former Uttar Pradesh Chief


नाशिक, 14 एप्रिल (हिं.स.)उत्तर प्रदेशचे माजी मुख्य सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी नाशिक येथील स्मार्ट सिटी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन उपस्थित होते. तसेच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, नाशिक शहर पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण तसेच कुंभमेळा प्राधिकरणाचे तहसीलदार मकरंद दिवाकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कुंभमेळा व्यवस्थापनातील आपल्या दीर्घ अनुभवाच्या आधारे मिश्रा यांनी सिंहस्थाच्या तयारीसंदर्भात व्यापक मार्गदर्शन केले. विविध विभागांमधील समन्वय आणि नियमित आढावा बैठका यांवर भर देत, कामांची वेळेत पूर्तता होण्यासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी आणि सातत्यपूर्ण देखरेख आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सद्यस्थितीचा उपयोग विविध यंत्रणांची चाचणी घेण्यासाठी करावा, असे सांगताना त्यांनी प्रत्यक्ष कामकाज अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित केली. निरीक्षण व्यवस्था, तसेच इतर पायाभूत सुविधांचा आढावा घेऊन त्यांची कार्यक्षमता वाढविण्यावरही त्यांनी भर दिला. गर्दी व्यवस्थापन आणि प्रशासकीय समन्वयासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर स्वच्छता, शिस्त आणि जनजागृती यामध्ये नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

भाविक व पर्यटकांच्या दृष्टीने शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता आणि देखभाल यामध्ये सर्व संबंधित घटकांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. शहरातील सौंदर्यीकरण आणि स्वच्छता उपक्रमांमुळे एकूण तयारी अधिक सक्षम होईल, असेही त्यांनी सांगितले. सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची तयारी ही शहराच्या दीर्घकालीन पायाभूत सुविधा आणि सेवा व्यवस्थेच्या बळकटीकरणाची संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande