काँग्रेसने आंबेडकरांना विशेष सन्मानापासून वंचित ठेवलं - नितीन नवीन
नवी दिल्ली, 14 एप्रिल (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी मंगळवारी काँग्रेसवर आरोप केला की त्यांच्या सरकारांनी बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांचा नेहमीच अपमान केला आणि त्यांना विशेष सन्मानापासूनही वंचित ठेवलं.
Nitin Nabin


नवी दिल्ली, 14 एप्रिल (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी मंगळवारी काँग्रेसवर आरोप केला की त्यांच्या सरकारांनी बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांचा नेहमीच अपमान केला आणि त्यांना विशेष सन्मानापासूनही वंचित ठेवलं.

डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पक्षाच्या मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात नितीन नवीन यांनी हे विधान केले. नितीन नवीन म्हणाले, “स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांत एका विशिष्ट कुटुंबाशिवाय इतर कुणालाही सन्मान देण्याची मानसिकता होती. संविधानाचे शिल्पकार असलेल्या व्यक्तीला दशकानुदशके योग्य सन्मान मिळाला नाही. पंडित नेहरू यांनी १९५२ आणि १९५४ च्या निवडणुकांमध्ये बाबासाहेबांना पराभूत करण्याचा आणि त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर मतदार यादीत छेडछाड करून त्यांना रोखण्याचाही प्रयत्न करण्यात आला. ”

भाजपा अध्यक्ष म्हणाले, “नेहरू-गांधी कुटुंबाने स्वतःलाच भारतरत्न दिलं, पण बाबासाहेबांना या सन्मानापासून वंचित ठेवलं. मात्र, माझं मत आहे की त्या काळानंतर जेव्हा वाजपेयी सरकार सत्तेत आलं, तेव्हा त्यांनी डॉ. आंबेडकरांना भारतरत्न देण्याचं काम केलं. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी केवळ या वैचारिक वारशाला पुढे नेलं नाही, तर ‘पंचतीर्थ’ स्थापन करून त्यांच्या जीवनदर्शनाला जागतिक ओळख दिली. सध्याच्या सरकारने डॉ. आंबेडकरांशी संबंधित पाचही प्रमुख स्थळांना राष्ट्रीय अभिमानाचं केंद्र बनवून त्यांच्या अनुयायांना आणि संपूर्ण देशाला गौरव मिळवून दिला आहे. ”

ते म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांचं संपूर्ण आयुष्य समाजसुधारणा, शिक्षण आणि समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी समर्पित होतं. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून महिलांना अधिकार दिले आणि समाजातील शेवटच्या व्यक्तीचा आवाज बुलंद केला. आज पंतप्रधान मोदी त्यांच्या आदर्शांवर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ‘अंत्योदय’च्या स्वप्नावर काम करत आहेत. नितीन नवीन म्हणाले की, आंबेडकरांच्या आदर्शांची प्रासंगिकता आजही कायम आहे. समाजातील प्रत्येक घटकाला आवाज देण्याचं आणि त्यांचा आवाज बुलंद करण्याचं जे काम त्यांनी केलं, ते निश्चितच आजही समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणा देतं.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande