नाशिक टीसीएस धर्मांतर तक्रारींची गंभीर दखल; टाटा सन्स अध्यक्षांची ग्वाही
मुंबई, 14 एप्रिल (हिं.स.)। टीसीएसच्या नाशिक शाखेतील तक्रारी, आरोप, धमक्या, दडपणे याची अत्यंत गंभीर दखल कंपनीने घेतल्याचे टाटा सन्स चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले. गेले काही दिवस या कंपनीत कर्मचाऱ्यांचा धार्मिक छळ, धर्मांतर झाल्याच्या तक
टाटा सन्स चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन


मुंबई, 14 एप्रिल (हिं.स.)। टीसीएसच्या नाशिक शाखेतील तक्रारी, आरोप, धमक्या, दडपणे याची अत्यंत गंभीर दखल कंपनीने घेतल्याचे टाटा सन्स चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले.

गेले काही दिवस या कंपनीत कर्मचाऱ्यांचा धार्मिक छळ, धर्मांतर झाल्याच्या तक्रारी येत होत्या. यासंदर्भात पोलीस तक्रारही करण्यात आली असून आरोपींना अटकही झाली आहे. याबाबत चंद्रशेखरन यांनी प्रसार माध्यमांना निवेदन दिले आहे.हा प्रकार अत्यंत चिंताजनक आणि उद्वेगजनक आहे. याची अत्यंत गांभीर्यपूर्वक दखल घेण्यात आली आहे. आरोपी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून संबंधित पोलीस तपासाला कंपनी पूर्ण सहकार्य करीत आहे. आपल्या कर्मचाऱ्यांनी कोणालाही दिलेल्या धमक्या, दडपणे किंवा गैरप्रकार याबाबत टाटा ग्रुप झिरो टॉलरन्स धोरण राबवित आहे. यासंदर्भात सत्य जाणून घेण्यासाठी सखोल चौकशी केली जाईल. टीसीएसच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आरती सुब्रमणियन ही चौकशी करतील. तसेच या संदर्भातील कार्यपद्धतीत सुधारणा आणि आवश्यक उपायोजना यांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande