डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सचिवपदी डॉ.सुधाकर बोकेफोडे
पुणे, 15 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सचिवपदी डॉ.सुधाकर बोकेफोडे व सदस्य म्हणून डॉ सुनील भंडगे यांची निवड झाली आहे. शासनाने अध्यादेशाद्वारे २१ सदस्यांची नांवे जाहीर केली असून समितीचा
Ndj


Jdk


पुणे, 15 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सचिवपदी डॉ.सुधाकर बोकेफोडे व सदस्य म्हणून डॉ सुनील भंडगे यांची निवड झाली आहे. शासनाने अध्यादेशाद्वारे २१ सदस्यांची नांवे जाहीर केली असून समितीचा कालावधी हा पुढील ३ वर्षांसाठी कालावधीसाठी निश्चित केला आहे.

डॉ . सुधाकर बोकेफोडे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख आहेत तर डॉ सुनील भंडगे हे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख आहेत. विद्यापीठाच्या या दोन अध्यासन प्रमुखांच्या निवडीमुळे मा.कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, प्र-कुलगुरु डॉ .पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ . प्रफुल्ल पवार तसेच विद्यापीठातील अन्य विभाग प्रमुखांनी डॉ .बोकेफोडे व डॉ . भंडगे यांचे अभिनंदन केले आहे .

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande