अमरावती विमानतळाला वर्षभरात दमदार प्रतिसाद; ४६९ उड्डाणे, १४,३१६ प्रवाशांच्या प्रवासाची नोंद
अमरावती, 15 एप्रिल (हिं.स.) | एकवर्षापूर्वी १६ एप्रिल २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे उद्घाटन झाले आणि पहिले विमान मुंबईकडे झेपावले. तेव्हापासून एक वर्षाच्या कालावधीत अमरावती विमानतळावरून आगमन वनिर्गमन अशाएटीआ
अमरावती विमानतळाला वर्षभरात दमदार प्रतिसाद वर्षभरात ४६९ उड्डाणे, १४,३१६ प्रवाशांचा प्रवासाची नोंद


अमरावती, 15 एप्रिल (हिं.स.) | एकवर्षापूर्वी १६ एप्रिल २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे उद्घाटन झाले आणि पहिले विमान मुंबईकडे झेपावले. तेव्हापासून एक वर्षाच्या कालावधीत अमरावती विमानतळावरून आगमन वनिर्गमन अशाएटीआर ७२ आणि चार्टर फ्लाईटच्या एकूण ४६९ फेऱ्या झाल्या असून सुमारे १४३१६ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

अमरावती विमानतळाची निर्मिती १९९२ मध्ये झाली होती. तेव्हापासून हे विमानतळ फक्त व्हीआयपी व्यक्तींसाठी सुरू होते. मात्र १६ एप्रिल २०२५ रोजी सर्वसामान्य लोकांना या विमानतळावरून प्रवासाचा शुभारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अख्खं मंत्रिमंडळच या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.

एका वर्षात 469 फेऱ्या, 14316 प्रवाशीअमरावती विमानतळावर अलायन्स एअर कंपनीची सेवा सुरु आहे. याविमानाच्या मुंबई-अमरावती १३१ फ्लाईटस्चे आगमनतर अमरावती-मुंबई अशा १३१ फ्लाईटचे निर्गमन अशा एकूण २६२ फेऱ्या झाल्यात. यात मुंबईवरून अमरावतीमध्ये ६७५७ प्रवाशांचे आगमन झाले, तर अमरावतीवरून मुंबईसाठी ७०१४ प्रवाशांनी उड्डाणघेतले असून एकूण १३७७१ प्रवाशांनी प्रवास केला. सोबतच अमरावती विमानतळावर मुंबईवरून १०५ चार्टर फ्लाईटचे आगमन झाले तर १२० चार्टर फ्लाईट मुंबईला गेले. यामध्ये २६७ प्रवाशी आले तर २७८ प्रवाशी मुंबईला गेले. अशा प्रकारे चार्टर फ्लाईटच्या २०७ फेऱ्यांमधून ५४५ प्रवाशांनी प्रवास केला.

अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती विमानतळाचा शुभारंभ झाल्यानंतर विमानसेवेला प्रतिसाद मिळणार की नाही? असा प्रश्न होता. मात्र उपरोक्त आकडेवारी पाहता या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे येथून नाईट लँडींग आणि मुंबई शिवाय अन्यत्र उड्डाण सुरु करण्याची मागणी होत आहे.याच विमानतळावर आशिया खंडातील सर्वात मोठ्या एअर इंडियाचे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारले जात आहे. एकाच वेळी या विमानतळावर दोन विमान पार्किंग होऊ शकतात. लवकरच या विमानतळावरून नाईट लैंडिग सुरू होणार आहे. या विमानतळाच्या धाववपट्टीची लांबी 1850 मीटर असून 45 मीटर रुंद आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande