
रायगड, 15 एप्रिल (हिं.स.)।‘मी आणि माझे कुटुंबीय’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला उद्योजक , अनिसच्या कार्यकर्त्या , माजी पंचायत सभापती , माजी सरपंच तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष यांच्यासह धाटावकर कुटुंबीय व रामराज पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
कार्यक्रमात ऍड. मयूर धाटावकर, ऍड. विनायक धाटावकर आणि प्रकाश धाटावकर यांनी मनोगत व्यक्त करत पुस्तकाच्या निर्मितीमागील प्रेरणा आणि कुटुंबीयांच्या आठवणींना उजाळा दिला.
पुस्तक लेखनाबाबत भूमिका स्पष्ट करताना डॉ. धाटावकर यांनी सांगितले की, अमेरिकेतील शिकागो येथे वास्तव्यास असलेल्या त्यांच्या मुलगा राहुल याच्या सूचनेवरून कुटुंबाची वंशावळ (फॅमिली ट्री) जतन करण्याचा हा प्रयत्न सुरू झाला. रोहा तालुक्यातील धाटाव गावातून १८८३ साली रामराज येथे झालेल्या स्थलांतरापासून तब्बल १४२ वर्षांचा इतिहास त्यांनी या पुस्तकातून ओघवत्या शैलीत आणि छायाचित्रांसह मांडला आहे.
यावेळी चंद्रशेखर वागळे यांनी डॉ. धाटावकर यांच्या जडणघडणीचा वेध घेतला, तर मिलिंद अष्टमीकर यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात प्रा. शाम जोगळेकर यांनी डॉ. धाटावकर यांनी आतापर्यंत ३५ पुस्तकांचे लेखन केल्याचे नमूद करत, पुराभिलेख विभागातील त्यांच्या कार्याचा गौरव केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रवीण धाटावकर यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)