लाखोंची लूट, 4 जण अटकेत; खालापूर गुंतवणूक प्रकरण तापलं
रायगड, 15 एप्रिल (हिं.स.)। : खालापूर तालुक्यात गुंतवणुकीच्या आमिषाने सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणी खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरि
स्वावी


रायगड, 15 एप्रिल (हिं.स.)। : खालापूर तालुक्यात गुंतवणुकीच्या आमिषाने सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणी खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्ट 2024 ते 8 डिसेंबर 2025 या कालावधीत चौक परिसरात “सावी कन्सल्टन्सी इंटरप्रायझेस” व “स्वामीश कन्सल्टन्सी प्रा. लि.” या नावाने कार्यालय सुरू करण्यात आले होते. आरोपींनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय कडून मिळालेल्या उद्यम नोंदणी प्रमाणपत्राचा गैरवापर करून नागरिकांचा विश्वास संपादन केला.दलालांच्या माध्यमातून 17 महिन्यांत 12 टक्के परताव्याचे आमिष दाखवत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळण्यात आली. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना व्याज देऊन विश्वास निर्माण करण्यात आला, मात्र नंतर मूळ रक्कम व व्याज परत न करता गुंतवणूकदारांची फसवणूक करून रक्कमांचा अपहार करण्यात आला.

या प्रकरणात फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांची सुमारे 16 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक झाली असून शेकडो गुंतवणूकदार या घोटाळ्याचे बळी ठरल्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्यातील 04 आरोपींना नुकतीच अटक करण्यात आली आहे. याबाबत खालापूर पोलीस ठाणे विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि मोरे करीत आहेत.नागरिकांनी अशा आकर्षक योजनांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande