बीड - पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण वर्ग महाभियान संपन्न
बीड, 15 एप्रिल (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे आमदार नमिता मुंदडा केज येथे आयोजित ''पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण वर्ग महाभियान २०२६ या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास उपस्थित होत्या. आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ‘अंत्यो
अ


बीड, 15 एप्रिल (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे आमदार नमिता मुंदडा केज येथे आयोजित 'पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण वर्ग महाभियान २०२६ या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास उपस्थित होत्या.

आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ‘अंत्योदय’ या विचारधारेतून प्रेरणा घेऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे हे आपले ध्येय आहे. या प्रशिक्षण महाभियानातून मिळालेली ऊर्जा आणि दिशा आगामी काळात निश्चितच आपल्या कार्याला नवी गती देईल, असा विश्वास आहे. या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून मतदारसंघातील भाजपाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देणे, प्रत्येक कार्यकर्त्याला विचारांची दिशा देणे आणि बूथ स्तरापर्यंत पक्षाची ताकद अधिक सक्षम करणे हा प्रमुख उद्देश होता.

या प्रसंगी सर्व मंडळ अध्यक्ष, बूथ प्रमुख आणि समर्पित कार्यकर्त्यांशी सखोल संवाद साधला. त्यांच्या अनुभव, सूचना आणि स्थानिक पातळीवरील अडचणी जाणून घेतल्या व आगामी काळातील नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.

तसेच जिल्हा कार्यकारिणीतील प्रमुख वक्त्याचे मार्गदर्शन लाभले. यावेळी केज शहरातील सर्व मंडळ अध्यक्ष, बूथप्रमुख यांच्यासह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande