पुण्यात एमडी ड्रग्स तस्करी उघड; दोघांना अटक
पुणे, 15 एप्रिल (हिं.स.)। विमानतळ पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून एमडी, मोटार असा 26 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रीतम प्रफुल्ल कुलकर्णी (वय 37, रा. साईनाथनगर, व
अटक लोगो


पुणे, 15 एप्रिल (हिं.स.)। विमानतळ पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून एमडी, मोटार असा 26 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रीतम प्रफुल्ल कुलकर्णी (वय 37, रा. साईनाथनगर, वडगाव शेरी), उबेर अन्सार खान (वय 27, रा. रेल्वे गेटजवळ, हडपसर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांच्या विरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी हरी पुंडे आणि लालू कऱ्हे या दोघांना बातमी मिळाली होती की, जनक बाबा दर्गा चौकाजवळ खराडी बायपास चौकातून फॉरेस्ट पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर एक व्यक्ती एमडी विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड आणि त्यांच्या पथकाने प्रीतम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 3.59 ग्राम एमडी आणि दुचाकी जप्त करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande