आयटी पार्कला मिळणार गती; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर, 15 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्याच्या औद्योगिक आणि तांत्रिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या ''आयटी पार्क'' (IT Park) प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ''आयटी असोसिएशन ऑफ सोलापूर''च्या (ITAS) शिष्टमंडळाने नवनियु
IT Park


सोलापूर, 15 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्याच्या औद्योगिक आणि तांत्रिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या 'आयटी पार्क' (IT Park) प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 'आयटी असोसिएशन ऑफ सोलापूर'च्या (ITAS) शिष्टमंडळाने नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन यांची सदिच्छा भेट घेऊन या प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली.

आयटीएएसचे अध्यक्ष अपूर्व जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. या भेटीत प्रस्तावित आयटी पार्क प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सादरीकरण करण्यात आले. हा प्रकल्प मार्गी लागल्यास सोलापुरात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, स्थानिक आयटी कंपन्यांना संधी मिळतील आणि जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असे आयटीएएसने यावेळी नमूद केले.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आयटी असोसिएशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. सोलापूरचा आयटी क्षेत्रातील विकास जिल्ह्यासाठी आवश्यक असल्याचे नमूद करत, या प्रकल्पासाठी प्रशासनाकडून जे काही आवश्यक सहकार्य लागेल, ते पूर्णपणे देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे आयटी क्षेत्रातील व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातारण आहे.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande