
सोलापूर, 15 एप्रिल (हिं.स.)। वीरशैव व्हिजनने मुक्या प्राण्यांसाठी पाण्याच्या जबाबदारीसह जलकुंभांचे वाटप करून महात्मा बसवेश्वर यांची शिकवण आचरणात आणली आहे असे प्रतिपादन जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज मुलाणी यांनी केले.
वीरशैव व्हिजनतर्फे मुक्या प्राण्यांसाठी जलकुंभांचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भीम प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे, बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे, अडत व्यापारी श्रीकांत धनशेट्टी, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, वीरशैव व्हिजन उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार उपस्थित होते.
प्रतिवर्षी बसव जयंतीनिमित्त वीरशैव व्हिजनतर्फे १० जलकुंभांचे पाण्याच्या जबाबदारीसह वाटप करण्यात येते. कै. मुत्यप्पा बिराजदार यांच्या स्मरणार्थ अडत व्यापारी संगमेश्वर बिराजदार हे प्रतिवर्षी १० जलकुंभ उपलब्ध करून देतात. यावेळी बसवराज सोलापुरे (सुनिल नगर), दयानंद हेले (शेळगी), वीरेंद्र हिंगमिरे (जोडभावी पेठ), श्रीशैल केंभावी (शाहीर वस्ती), आनंद चंडक (बुधले गल्ली) यांना पाण्याच्या जबाबदारीसह देण्यात आले.यावेळी सोमनाथ चौधरी शिवानंद सावळगी, राहुल बिराजदार, गौरीशंकर बाळशेट्टी आदी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड