
गोंदिया, 16 एप्रिल (हिं.स.) : भारतातील आघाडीचा आणि विश्वासार्ह दागिन्यांचा ब्रँड Kalyan Jewellers ने महाराष्ट्रातील गोंदिया शहरात आपले नवे भव्य शोरूम सुरू केले आहे. बुधवारी या शोरूमचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला.नवीन शोरूममध्ये ग्राहकांना आकर्षक, दर्जेदार आणि विविधतेने नटलेले दागिने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज, देखणे आणि आरामदायी वातावरण ग्राहकांना एक वेगळाच खरेदीचा अनुभव देणार आहे.
कंपनीचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरामन यांनी सांगितले की, “गोंदियातील या नवीन शोरूमद्वारे ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करणारे एक सर्वसमावेशक इकोसिस्टम निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. विश्वास आणि पारदर्शकता या मूल्यांवर आधारित राहून आम्ही उत्कृष्ट सेवा आणि उच्च दर्जाचे दागिने देण्यास कटिबद्ध आहोत.”
शोरूमच्या उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स जाहीर करण्यात आल्या असून दागिन्यांच्या घडणावळीवर 50 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. तसेच, कंपनीचा ‘स्पेशल गोल्ड बोर्ड रेट’ मर्यादित कालावधीसाठी लागू असेल, जो बाजारातील सर्वात कमी दरांपैकी एक मानला जातो.
येथील सर्व दागिने ‘बीआयएस’ हॉलमार्क असलेले असून त्यांची शुद्धता विविध चाचण्यांद्वारे तपासली जाते. ग्राहकांना ‘4-स्तरीय आश्वासन प्रमाणपत्र’ देण्यात येते, ज्यामध्ये शुद्धतेची हमी, आजीवन मोफत देखभाल, उत्पादनाची सविस्तर माहिती आणि पारदर्शक एक्सचेंज व बाय-बॅक धोरणांचा समावेश आहे.
या शोरूममध्ये ‘मुहूरत’, ‘मुद्रा’, ‘निमाह’, ‘ग्लो’, ‘झिया’, ‘अनोखी’, ‘अपूर्वा’, ‘अंतरा’, ‘हेरा’, ‘रंग’ आणि नव्याने सादर केलेले ‘लीला’ यांसारख्या लोकप्रिय कलेक्शन्सही उपलब्ध असतील.
ग्राहकांना उत्कृष्ट सेवा आणि अद्वितीय दागिन्यांचा अनुभव देण्याच्या उद्देशाने हे शोरूम गोंदियातील एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे.-----------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis