गोवा : मडगावमध्ये मर्सिडीज-बेंझचे अत्याधुनिक लक्झरी सेवा केंद्राचा शुभारंभ
मडगाव, 17 एप्रिल (हिं.स.) : भारतातील अग्रगण्य लक्झरी कार उत्पादक मर्सिडीज-बेंझ इंडियाने गोव्याच्या मडगाव येथे अत्याधुनिक लक्झरी सेवा सुविधा केंद्राचे उद्घाटन केले आहे. या नव्या केंद्रामुळे कंपनीचा दक्षिण गोव्यातील विस्तार अधिक बळकट झाला असून ग्राहक
गोव्याच्या मडगावमध्ये मर्सिडीज-बेंझचे अत्याधुनिक लक्झरी सेवा केंद्राचा शुभारंभ


मडगाव, 17 एप्रिल (हिं.स.) : भारतातील अग्रगण्य लक्झरी कार उत्पादक मर्सिडीज-बेंझ इंडियाने गोव्याच्या मडगाव येथे अत्याधुनिक लक्झरी सेवा सुविधा केंद्राचे उद्घाटन केले आहे. या नव्या केंद्रामुळे कंपनीचा दक्षिण गोव्यातील विस्तार अधिक बळकट झाला असून ग्राहक-केंद्रित सेवेला नवे बळ मिळाले आहे.

दक्षिण गोवा हा वेगाने विकसित होणारा लक्झरी ग्राहकवर्ग असलेला प्रदेश असून, या नव्या सुविधा केंद्रामुळे मर्सिडीज-बेंझची उपस्थिती येथे अधिक मजबूत झाली आहे. कंपनीच्या वाढत्या बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याच्या धोरणानुसार हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.काउंटो मोटर्स मडगावच्या उद्घाटनामुळे मर्सिडीज-बेंझ आता दक्षिण गोव्यातील ग्राहकांना जागतिक दर्जाच्या सेवा मानकांसह सेवा देणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या घराजवळच सोयीस्कर आणि त्रासमुक्त ओनरशिप अनुभव मिळणार आहे. गोव्यातील हे काउंटो मोटर्सचे दुसरे मर्सिडीज-बेंझ सुविधा केंद्र असून, यापूर्वी उत्तर गोव्यातील रिबंदर येथे 3-एस सुविधा केंद्र कार्यरत आहे.

मर्सिडीज-बेंझ इंडियाच्या ग्राहक सेवा विभागाचे उपाध्यक्ष शेखर भिडे यांनी सांगितले की, “गोवा ही जलदगतीने विकसित होणारी लक्झरी बाजारपेठ असून येथे मर्सिडीज-बेंझ वाहनांची मागणी वाढत आहे. दक्षिण गोव्यातील पहिले सेवा सुविधा केंद्र सुरू करून आम्ही ग्राहकांना अधिक वैयक्तिकृत आणि उत्कृष्ट सेवा अनुभव देत आहोत.” या सेवा केंद्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. 4 सेवा बे, कार्यक्षम कार्यशाळा, तसेच XENTRY, स्कायलाईन, OAB आणि DSD Tab यांसारख्या प्रणालींमुळे जलद आणि पारदर्शक सेवा देणे शक्य होणार आहे. ग्राहकांना रिअल-टाइम अपडेट्सही मिळणार आहेत. यावेळी काउंटो मोटर्सचे संचालक आकाश खांते यांनी सांगितले की, “मडगावमधील हे नवीन केंद्र आम्हाला दक्षिण गोव्यातील ग्राहकांच्या अधिक जवळ आणते. यामुळे आम्ही जागतिक दर्जाच्या विक्री आणि विक्रीपश्चात सेवा देऊ शकतो.

प्रमुख सेवा सुविधा:- नियमित देखभाल व दुरुस्ती

ऍडव्हान्स्ड डायग्नोस्टिक्स सेवा

अस्सल सुटे भाग उपलब्धता

डिजिटल जॉब कार्ड सुविधा

पिक-अप व ड्रॉप सेवा

वॉरंटी व गुडविल सेवा

या नव्या सुविधा केंद्रामुळे मर्सिडीज-बेंझचा गोव्यातील ग्राहकांशी संबंध अधिक दृढ होणार असून, प्रीमियम सेवा अनुभवाची पातळीही उंचावणार आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके 


 rajesh pande