बीड - सावता परिषदेच्या वतीने 'जागर विचारांचा ' अभियान
बीड, 21 एप्रिल, (हिं.स.)। क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त सावता परिषदेच्या वतीने राज्यभर ''जागर विचारांचा'' हे व्यापक अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत राज्यातील दोनशे ठिकाणी व्याख्यानमालेचे आय
बीड - सावता परिषदेच्या वतीने 'जागर विचारांचा ' अभियान


बीड, 21 एप्रिल, (हिं.स.)। क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त सावता परिषदेच्या वतीने राज्यभर 'जागर विचारांचा' हे व्यापक अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत राज्यातील दोनशे ठिकाणी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सावता परिषदेचे महासचिव डॉ. राजीव काळे यांनी दिली.

महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारपेरणीतून पुरोगामी समाजरचना उभी राहिली. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जोपासना त्यांच्या साहित्य व कार्यातून घडली. वंचित व उपेक्षित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. आज ग्रामीण वस्ती, तांडा यांसारख्या भागांतूनही प्रशासकीय अधिकारी घडत आहेत, हे फुले विचारांचेच यश असल्याचे अधोरेखित करण्यात आले. सामाजिक व शैक्षणिक जागृती अधिक बळकट करण्यासाठी सावता परिषद कटिबद्ध असून, या द्विशताब्दी वर्षानिमित्त २०० व्याख्यानांच्या माध्यमातून 'विचारांचा जागर' घडविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. हे अभियान ११ एप्रिल २०२७पर्यंत राज्यभर राबविण्यात येणार असून, ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande