शबरी आवास योजनेचे शेकडो प्रस्ताव धारणी प्रकल्प कार्यालयाकडे धूळखात
अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.)। नगर पंचायत अंतर्गत शासनाच्या शबरी आवास योजने अंतर्गत घरकुलाचे शेकडो प्रस्ताव धारणी प्रकल्प कार्यालयाकडे दोन वर्षांपासून प्रलंबित असून शहराच्या नगराध्यक्ष सौ.प्राप्ती मारोटकर यांनी लाभार्थ्यांसह जिल्हाधिकारी यांची भेट घे
शबरी आवास योजनेचे शेकडो प्रस्ताव धारणी प्रकल्प कार्यालयाकडे धूळखात


अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.)। नगर पंचायत अंतर्गत शासनाच्या शबरी आवास योजने अंतर्गत घरकुलाचे शेकडो प्रस्ताव धारणी प्रकल्प कार्यालयाकडे दोन वर्षांपासून प्रलंबित असून शहराच्या नगराध्यक्ष सौ.प्राप्ती मारोटकर यांनी लाभार्थ्यांसह जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शबरी आवास योजनेच्या घरकुलासह विविध समस्यांकडे लक्ष वेधून याबाबतीत मागणीचे निवेदन सादर केले.

पारधी, आदिवासी समाजाकरिता शासनाच्या शबरी आवास योजने अंतर्गत नगर पंचायत मार्फत धारणी प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे घरकुल मंजुरीचा संपूर्ण प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी सादर केला आहे मात्र सदर प्रस्तावास अद्याप मान्यता मिळाली नसल्याने पारधी समाज व आदिवासी समाजाचे लाभार्थी घरकुला पासून वंचित आहे. सदर प्रस्तावास तात्काळ मान्यता देण्यात यावी. तसेच शहरातील कचरा व्यवस्थापना करिता प्रस्तावित घनकचरा प्रकल्प निर्माण करणे, पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी प्रलंबित असलेले अनुदान तात्काळ देण्यात यावे. विविध जागा मागणीचे प्रस्ताव हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानातील प्रस्तावित कामे, पर्यावरण, पर्यटन, जिल्हा वार्षिक नियोजनातील प्रस्तावित विकास कामे, रस्ते अनुदान,दलितोत्तर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती योजना इत्यादी कामाबाबत व विविध समस्यांबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी नगराध्यक्ष सौ.प्राप्ती मारोटकर न.पं. गटनेते प्रकाश मारोटकर यांनी चर्चा करून विकास कामाचे प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली यावेळी पारधी समाज संघटनेचे सूरज पवार बंटी भोसले उपस्थित होते.

शबरी आवास योजने अंतर्गत घरकुलाचे प्रस्ताव लक्षांक अभावी प्रलंबित असल्याचे धारणी प्रकल्प अधिकारी यांनी सांगितले परंतु सदरचे घरकुल पारधी पॅकेज मधून करता येते मा जिल्हाधिकारी यांच्या अद्यक्षतेखाली पारधी पॅकेजच्या आराखडा बैठकीत हा निर्णय घेतल्यास पारधी समाजाला घरकूल मिळू शकतील असे मत न प गटनेते प्रकाश मारोटकर यांनी व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande