जळगाव - आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
जळगाव, 21 एप्रिल (हिं.स.) गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि आयक्यूएसी तसेच आयआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये
जळगाव - आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ


जळगाव, 21 एप्रिल (हिं.स.) गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि आयक्यूएसी तसेच आयआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये एकूण ९८ संशोधन पेपर सादर केले गेले.सदर परिषदेचे उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाला बीज भाषण देण्यासाठी डॉ. बेदात्री मौलिक (विद्युत विभाग, अमेटी युनिव्हर्सिटी नोएडा) होत्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. महेश एच पाटील (समन्वयक), डॉ. अतुल बर्हाटे (उपसमन्वयक) डॉ. तुषार कोळी (अधिष्ठाता), डॉ. हेमंत इंगळे (अधिष्ठाता, रिसर्च अँड डेव्हलपमेंट ) तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग आणि सहभागी संशोधक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

आंतरराष्ट्रीय परिषदेबद्दल माहिती देताना परिषदेमध्ये सादर होणार्या संशोधन तसेच संशोधनासाठी उपस्थित असलेल्या तज्ञ मार्गदर्शक यांच्या बद्दल माहिती दिली. तसेच संशोधन व नाविन्यता याबद्दल सांगताना सद्यस्थितीतील सर्व प्रकारच्या शाखांच्या प्रणालीचा विकास यावर भाष्य केले. त्याचप्रमाणे या कॉन्फरन्स मध्ये संपूर्ण भारतभरातून जसे की महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या ठिकाणाहून संशोधक आपले संशोधन सादर करणार आहेत. हे त्यांनी नमूद केले. आज घडीला महाविद्यालयांमध्ये अमुलाग्र बदल घडून येत आहेत व ती काळाची गरज आहे. त्यामुळेच महाविद्यालयामध्ये नाविन्यपूर्ण व संशोधनाला अनुसरून कार्यक्रम घेण्यात येत असतात. तसेच संशोधन करणार्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की ५जी व ६जी, एज कॉम्प्युटिंग, जनरेटिव्ह ए आय या क्षेत्रामध्ये खूप वाव आहे हे त्यांनी नमूद केले.तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांबद्दल सांगताना त्यांनी नमूद केले की विद्यार्थी हे एआयसीटीने लॉन्च केलेल्या वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून तसेच स्टार्टअप च्या माध्यमातून बुट कॅम्प मध्ये सहभागी होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इनोवेशन्स वाढीला लागत आहे.त्यानंतर गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये वेगवेगळ्या विभागातून पेपर्स आले आहेत व प्रत्येक वर्षी रिसर्च चे आकडे हे निरंतर वाढत आहे हे कौतुकास्पद आहे. अशाच पद्धतीने संशोधनाची वाढती वाटचाल राहील ही अपेक्षा व्यक्त केली.तसेच विकसित भारताचे स्वप्न यामध्ये प्रत्येकाचे योगदान गरजेचे आहे. त्यांनी परिषदेमध्ये आलेल्या सर्व संशोधकांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्यानंतर या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये डॉ. बेदात्री मौलिक यांचे बीज भाषण झाले. त्यांच्या बीज भाषणाचा विषय ड्रायव्हिंग पॅटर्न रिकग्निशन इन एनर्जी इफिशियंट ड्रायव्हिंग हा होता.त्यामध्ये त्यांनी करंट एनवोर्मेंटल इशूज बद्दल सांगताना पॉल्युशन आणि त्याचे इम्पॅक्ट तसेच कन्व्हेंशनल वाहने यांच्याशी निगडित असलेले प्रॉब्लेम्स याबद्दल सांगितलं. त्याचप्रमाणे रोड सेफ्टी आणि सिक्युरिटी रिस्क बद्दल सांगताना रस्त्यावर होणारे विविध अपघात व त्या मागची कारणे सांगितले. एफिशियंट ड्रायव्हिंग कशाप्रकारे चांगली असते याबद्दल सांगताना त्यांनी इलेक्ट्रिक ड्रायव्हिंग चा संदर्भ देत स्पष्टीकरण केले. ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम च्या माध्यमातून त्यांनी एडिट क्रूज कंट्रोल, ऍडॉप्टीव्ह लाईट कंट्रोल, ऑटोमॅटिक ब्रेकिंग, ऑटोमॅटिक पार्किंग सिस्टीम, इंटेलिजंट स्पीड, टायर प्रेशर मॉनिटरिंग लेन डिपार्चर वार्निंग या वेगवेगळ्या व्याख्यांच्या माध्यमातून समजावले.

ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम च्या माध्यमातून *ड्रायव्हिंग स्टाईल आणि कंडिशन मॉनिटरिंग, ड्रायव्हर आयडेंटिफिकेशन, ऑटोमॅटिक कंट्रोल आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्स्पेक्टिव्ह, ड्रायव्हिंग सायकल्सचा इम्पॅक्ट, पावर मॅनेजमेंट एनर्जी मॅनेजमेंट व बॅटरी मॅनेजमेंट यांच्या बद्दल सविस्तर माहिती दिली. पॉवर मॅनेजमेंट कंट्रोल मध्ये टोयाटा प्रियसचे उदाहरण देताना वेगवेगळ्या कंडिशन मध्ये पण कसे चालते याबद्दल सांगितले.तसेच रूल बेस्ट पॉवर मॅनेजमेंट वेगवेगळ्या कंडीशन सविस्तर सांगितले. तसेच एनर्जी कॅन्सम्प्शन बद्दल वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्टीकरण केले.ड्रायव्हिंग पॅटर्न बाय इंडिव्हिज्युअल स्टाइल, रोड ट्रॅफिक आणि एक्स्टर्नल कंडिशन्स, रियालायझेशन ऑफ इको ड्रायव्हिंग, इम्पॉर्टन्स ऑफ अक्युरसी याबद्दल पूर्ण माहिती सांगितली.अशा विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला.त्यानंतर अभियांत्रिकीच्या विविध शाखांचे संशोधनकर्ते यांनी कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व बेसिक सायन्सेस या विषयांमध्ये आपले संशोधन ऑनलाइन पद्धतीने सादर केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande