
नवी दिल्ली , 21 एप्रिल (हिं.स.)।भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भातील प्रयत्न आता अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचले आहे. या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी भारतीय प्रतिनिधीमंडळ या आठवड्यात वॉशिंग्टनला पोहोचत आहे. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती दिली आहे.
सर्जिओ गोर यांनी एका ट्विटद्वारे अधिकृत पुष्टी करत सांगितले की, भारतीय व्यापार प्रतिनिधीमंडळ या आठवड्यात वॉशिंग्टनला पोहोचत आहे. या महत्त्वाच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम स्वरूप देणे हा आहे. भारत- अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराशी संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यासाठी विशेष भारतीय व्यापार प्रतिनिधीमंडळ याच आठवड्यात वॉशिंग्टन दौऱ्यावर जाणार आहे. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी या दौऱ्याचे स्वागत करत, व्यापार कराराला अंतिम रूप देण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे. या कराराच्या आर्थिक परिणामांवर भाष्य करताना अमेरिकन राजदूत म्हणाले की, हा आगामी करार भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांसाठी ‘विन-विन’ म्हणजेच फायदेशीर ठरणार आहे.अमेरिकन राजदूतांच्या विधानामुळे ट्रम्प प्रशासन हा द्विपक्षीय करार दोन्ही देशांसाठी परस्पर लाभदायक मानत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता उद्योगजगताचे लक्ष या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या बैठका आणि करारावर अंतिम शिक्का कधी बसतो याकडे लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode