
मुंबई, 21 एप्रिल, (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, खबरदारीच्या उपाययोजना म्हणून त्यांच्यावर वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. त्यामुळे त्यांचा आजचा बारामती दौरा रद्द करण्यात आला आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना नियमित तपासणी आणि काही वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या विविध चाचण्या सुरू असून, अहवाल आल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक स्पष्ट माहिती समोर येईल. दरम्यान, शरद पवार यांना मागील महिन्यातही प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आज पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु