
नंदुरबार, 21 एप्रिल (हिं.स.) शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनींमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी निवासी
व अनिवासी खेळाडूंच्या प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक कारणास्तव बदल करण्यात आला आहे. ‘खेलो इंडिया राज्य
निपुणता केंद्र’ अंतर्गत होणाऱ्या काही खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धांमुळे राज्यस्तरीय चाचण्यांच्या तारखा पुढे
ढकलण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविली आहे.
या सुधारित वेळापत्रकानुसार, मैदानी, सायकलिंग आणि शूटिंग या खेळांच्या चाचण्या आता थेट
राज्यस्तरावर आयोजित केल्या जाणार आहेत.
मैदानी व सायकलिंग: (थेट राज्यस्तर), चाचणी प्रकार- खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र, सुधारीत
राज्यस्तर कार्यक्रम 11 व 12 मे, 2026 उपस्थितीची वेळ 11 मे रोजी सकाळी 09-00 वाजता
फुटबाल: चाचणी प्रकार- सरळ प्रवेश 15 व 16 मे, 2026 उपस्थितीची वेळ 15 मे रोजी सकाळी
09-00 वाजता. कौशल्य चाचणी- 17 व 18 मे, 2026 उपस्थितीची वेळ 17 मे रोजी सकाळी
09-00 वाजता.
शुटींग : (थेट राज्यस्तर), चाचणी प्रकार- खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र, सुधारीत राज्यस्तर
कार्यक्रम 18 व 19 मे, 2026 उपस्थितीची वेळ 18 मे रोजी सकाळी 09-00 वाजता
क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या सर्व खेळाडूंनी
https://forms.gle/२d३yQi४ZAoXLrwaj८ या गुगल लिंकवर आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे.
जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेऊन वेळेवर उपस्थित राहावे, असेही
आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर