जळगावमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर पदभरती जाहीर
जळगाव, 21 एप्रिल (हिं.स.) : राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला), जळगाव येथे विविध विषयांसाठी तासिका तत्वावर निदेशक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. संस्थेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या विषयासाठी 1 पद उपलब्ध अस
जळगावमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर पदभरती जाहीर


जळगाव, 21 एप्रिल (हिं.स.) : राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला), जळगाव येथे विविध विषयांसाठी तासिका तत्वावर निदेशक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

संस्थेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या विषयासाठी 1 पद उपलब्ध असून, संबंधित विषयातील पदवी, डिप्लोमा किंवा आयटीआय (NCVT) पात्रता आवश्यक आहे. तसेच एम्प्लॉयबिलिटी स्किल्स या पदासाठी एमबीए, बीबीए किंवा बीसीए पात्रता अनिवार्य आहे.

ही सर्व पदे तासिका तत्वावर भरली जाणार आहेत. इच्छुक, पात्र व अनुभवी उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज दिनांक 24 एप्रिल 2026 पर्यंत संस्थेत प्रत्यक्ष सादर करावेत.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला), जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande