सकसता आणि गेयतेने कविता अधिक सर्वस्पर्शी - डॉ.बी.जी.वाघ
नाशिक, 21 एप्रिल (हिं.स.)। ज्या साहित्यात भावभावनांसह समाज जीवनाचे चिंतन असते, ते साहित्य अक्षरवाड्.मय ठरते. कवी रविकांत शार्दूल यांच्या कवितेत सकसतेसह गेयता असल्याने ती अधिक सर्वस्पर्शी झाली आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी ज्येष्ठ साह
सकसता आणि गेयतेने कविता अधिक सर्वस्पर्शी - डॉ.बी.जी.वाघ


नाशिक, 21 एप्रिल (हिं.स.)। ज्या साहित्यात भावभावनांसह समाज जीवनाचे चिंतन असते, ते साहित्य अक्षरवाड्.मय ठरते. कवी रविकांत शार्दूल यांच्या कवितेत सकसतेसह गेयता असल्याने ती अधिक सर्वस्पर्शी झाली आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.बी.जी.वाघ यांनी केले.

हुतात्मा स्मारकात गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ज्येष्ठ साहित्यिक आणि नारायण सुर्वे कवी कट्ट्याचे समन्वयक रविकांत शार्दूल यांच्या 'सूर गवसला मनामनातला' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ गझलकार खलील मोमीन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून डॉ.बी.जी.वाघ बोलत होते. पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ.नंदकुमार राऊत, निवेदक रवींद्र मालुंजकर, गझलकार प्राचार्य राजेश्वर शेळके, ज्येष्ठ साहित्यिक मधुकर गिरी, संयोजक सुरेश पवार, मातोश्री शांताबाई शार्दूल, कवी रविकांत शार्दूल मंचावर उपस्थित होते.

डॉ.बी.जी.वाघ पुढे म्हणाले की, प्रत्येक कवी हा खऱ्या अर्थाने विद्रोही असतो. सौजन्यशीलतेने तो नवी निर्मिती करत असतो. कवीने नव्या युगाची कथा आणि व्यथा मांडली पाहिजे, असेही ते म्हणाले. कवी खलील मोमीन यांनी कविता म्हणजे आलेल्या अनुभवांचं कलात्मक रूप असल्याचे सांगून कवी शार्दूल यांच्या काव्यलेखनाचा गौरव केला. प्रमुख पाहुण्यांची समायोचित भाषणे झाली. कवी रविकांत शार्दूल यांनीही मनोगत व्यक्त करत 'बुद्ध आणि भीमानं आम्हां तारिलं, ज्योतिबाच्या विचारानं जग पाहिलं' हे गीत सादर करून मंत्रमुग्ध केलं. युवाव्याख्याते डॉ.किरण सोनार यांना 'विद्यावाचस्पती' पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande