मेमू रेल्वे गाडीचा सोलापूर मध्य रेल्वे विभागा कडून प्रस्ताव सादर
लातूर, 21 एप्रिल, (हिं.स.) सोलापूर मध्य रेल्वे विभागाकडून लातूर-पुणे दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर ''मेमु'' रेल्वे गाडी सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्ड कडे पाठवला आहे, अशी माहिती मध्य रेल्वे सोलापूर विभाग चे वरिष्ट वाणिज्य व्यवस्थापक जयदीप प्रद
रेल्वे


लातूर, 21 एप्रिल, (हिं.स.) सोलापूर मध्य रेल्वे विभागाकडून लातूर-पुणे दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर 'मेमु' रेल्वे गाडी सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्ड कडे पाठवला आहे, अशी माहिती मध्य रेल्वे सोलापूर विभाग चे वरिष्ट वाणिज्य व्यवस्थापक जयदीप प्रदक्षिणे यांनी दिली. सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय बैठकीत लातूर-पुणे मेमो गाडीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

यामुळे लातूर ते पुणे प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हि बैठक विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजित मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती पार पडली. या बैठकी मधे विभागीय सल्लागार समिती सदस्य संजय निलेगावकर यांनी हरंगुळ हडपसर गाडी क्र. ११४२९/३० रेल्वे गाडी खडकी स्टेशन किंवा पुणे स्टेशनपर्यंत वाढवण्याची मागणीही केली. सध्या हडपसरहून पुणे शहरात जाण्यासाठी प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे ३०० ते ४०० रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च करावा लागतो. ही गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे सेवा वाढविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

याचबरोबर बैठकीत मुंबई-हैदराबाद स्लीपर वंदे भारत रेल्वे लातूर मार्गे सुरू करावी, नांदेड-हडपसर गाडी क्र. १७६२९/३० ट्रेन खडकी स्टेशन पर्यंत वाढवावी, तसेच लातूर रेल्वे स्थानकावरील पिट लाईन व प्लॅटफॉर्म क्रमांक ३ व ४ चे काम, हरंगुळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे रुंदी वाढवणे व घरणी येथील क्रॉसिंग स्टेशन चे काम लवकर पूर्ण करावे, अशा विविध मागण्याही मांडण्यात आल्या. लातूर-पुणे मेमू रेल्वेचा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यात रेल्वे मुख्यालयाकडे पाठविण्यात आला असून त्याची व्यवहार्यता तपासणीही करण्यात आली आहे, अशी माहिती सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक जयदीप प्रदक्षिणे यांनी दिली

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande