
परभणी, 21 एप्रिल (हिं.स.)सेलू शहरात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या सेवानिवृत्त कर्मचारी शमशोदिन शेख यांच्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला करून त्यांच्या डाव्या हाताला गंभीर जखम केली. ही घटना भोई गल्ली परिसरात घडली. शेख हे नेहमीप्रमाणे सकाळी फिरून घरी परतत असताना कुत्र्याने त्यांच्या डाव्या हाताला कडाडून चावा घेतला. कुत्र्याने अक्षरशः त्यांच्या हाताला पूर्ण तोंडात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र सुदैवाने मोठा अपघात टळला. तरीही त्यांच्या हाताला खोल जखम झाली असून त्यांना तत्काळ सेलू उपजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी अशीच धक्कादायक घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, नगर परिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्याधिकारी व नगराध्यक्ष मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कधी करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, जखमी शमशोदिन शेदाखल करण्यात आले. शहरातील भोई गल्ली, सुरज मोहल्ला (म्हसोबा चौक), जवेरी गल्ली आदी भागांमध्येही मोकाट कुत्र्यांकडून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चावा घेण्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषतः पाथरी, परभणी आणि जिंतूर येथे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये बालकांच्या मृत्यूच्या घटना ताज्या असतानाच, सेलू शहरातहीख यांनी यापूर्वीच नगर परिषदेकडे मोकाट कुत्र्यांच्या समस्येबाबत लेखी अर्ज दिला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.
शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे रेबिजसारख्या आजारांचा धोका वाढत असून, यावर्षीच 15 ते 20 नागरिकांना रेबिज लसीकरणाचा कोर्स घ्यावा लागल्याची माहिती समोर आली आहे. याआधीही एका सेवानिवृत्त शिक्षकाला कुत्र्याने चावा घेतल्यामुळे गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या पार्श्वभूमीवर शहरातील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा आणखी गंभीर घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis