बीड - पीटीआर देण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना तलवाड्याचा ग्रामसेवक जाळ्यात
बीड, 21 एप्रिल, (हिं.स.)। गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामसेवक सोपान मुसळे याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. एका तक्रारदाराच्या पीटीआर कामासाठी मुसळे याने सुरुवातीला दहा हजार रुपयांची मागण
बीड - पीटीआर देण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना तलवाड्याचा ग्रामसेवक जाळ्यात


बीड, 21 एप्रिल, (हिं.स.)। गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामसेवक सोपान मुसळे याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. एका तक्रारदाराच्या पीटीआर कामासाठी मुसळे याने सुरुवातीला दहा हजार रुपयांची मागणी केली होती, मात्र तडजोडीनंतर पाच हजार रुपये घेण्याचे ठरले. तक्रारदाराने या संदर्भात जालना एसीबीकडे धाव घेतली होती. त्यानुसार गेवराई येथील शासकीय कार्यालय परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

मुसळे याने लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली असून आरोपीविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि विशेषतः ग्रामविकास विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande