लातूर : पाटील यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात पोकळी- शिवेंद्र सिंह भोसले
लातूर, 21 एप्रिल (हिं.स.) : लातूरच्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मनोगत पालकमंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
गोपाळराव पाटील

पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण करताना शिवेंद्र राजे म्हणाले की, शिक्षणाचे महत्त्व ओळखून गोपाळराव पाटलांनी लातूरमध्ये शिवछत्रपती शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजर्षी शाहू महाविद्यालयाने घडवलेले विद्यार्थी पुढे जाऊन राज्य व देशपातळीवर उल्लेखनीय यश मिळवले. त्यामुळे “लातूर पॅटर्न” ही संकल्पना राष्ट्रीय स्तरावर ओळखली जाऊ लागली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. तसेच राज्यसभेचे सदस्य म्हणून काम करताना वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार आणि रेल्वे यांसारख्या महत्त्वाच्या समित्यांवर त्यांनी आपला अभ्यासपूर्ण ठसा उमटवला. “डॉ. गोपाळराव पाटील यांच्या जाण्याने आपण एक मार्गदर्शक हरवला आहे. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो,” अशा शब्दात भोसले यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ---------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

 rajesh pande