बीड - श्रीमद् भागवत कथेस २६ पासून होणार सुरुवात
बीड, 21 एप्रिल, (हिं.स.)। दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने गेवराई येथे भव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा २६ एप्रिल ते २ मे २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ४:३० ते रात्री ८:३० या वेळेत पार पडणार आहे. बी
बीड - श्रीमद् भागवत कथेस २६ पासून होणार सुरुवात


बीड, 21 एप्रिल, (हिं.स.)। दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने गेवराई येथे भव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा २६ एप्रिल ते २ मे २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ४:३० ते रात्री ८:३० या वेळेत पार पडणार आहे. बीड रोडवरील दसरा मैदान येथे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले

या सोहळ्याचे कथा वाचन सुश्री वैष्णवी भारती जी करणार आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला २५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता शहरातून मंगल

कलश यात्रा काढण्यात येणार आहे. या भागवत कथेच्या माध्यमातून धर्म, अध्यात्म, देशभक्ती आणि ज्ञान-विज्ञान यांचा संगम घडवून समाजात सकारात्मक विचारांचा प्रसार करण्याचा संस्थेचा उद्देश आहे. या सोहळ्यास सर्वश्री आशुतोष महाराज यांचे मार्गदर्शन लाभणार असून, दिव्य ज्योती परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गेवराई शहर व परिसरातील भाविकांनी या पवित्र ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बेदरे आणि अशोक आबा गायकवाड यांनी केले आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande