परभणीत ३० एप्रिलला ‘युगप्रवर्तक अभिवादन महोत्सव’
परभणी, 21 एप्रिल (हिं.स.)।भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त परभणी शहरात ‘युगप्रवर्तक अभिवादन महोत्सव’ाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता विष्णू जिनिंग मैदानावर पार पडणार असल्याची माहिती आ
परभणीत ३० एप्रिलला ‘युगप्रवर्तक अभिवादन महोत्सव’


परभणी, 21 एप्रिल (हिं.स.)।भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त परभणी शहरात ‘युगप्रवर्तक अभिवादन महोत्सव’ाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता विष्णू जिनिंग मैदानावर पार पडणार असल्याची माहिती आयोजक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी दिली.

यंदा या महोत्सवाचे २२ वे वर्ष असून, कार्यक्रमात सुप्रसिद्ध सिने पार्श्वगायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांच्या संगीत रजनीचे विशेष आकर्षण असणार आहे. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत उत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या जयंती मंडळांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

या युगप्रवर्तक अभिवादन महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande