कवीला निसर्ग वाचता आला पाहिजे-खलील मोमीन
नाशिक, 22 एप्रिल (हिं.स.)। :- कवी हा काळाचा भाष्यकार असतो. त्या-त्या काळात घडलेल्या घटनांच्या नोंदी तो कवितांमध्ये करत जातो. आशयसंपन्न काव्यनिर्मितीसाठी कवीला सर्वार्थाने निसर्ग वाचता आला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक खलील मोमीन यां
कवीला निसर्ग वाचता आला पाहिजे-खलील मोमीन


नाशिक, 22 एप्रिल (हिं.स.)।

:- कवी हा काळाचा भाष्यकार असतो. त्या-त्या काळात घडलेल्या घटनांच्या नोंदी तो कवितांमध्ये करत जातो. आशयसंपन्न काव्यनिर्मितीसाठी कवीला सर्वार्थाने निसर्ग वाचता आला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक खलील मोमीन यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित 'पुस्तकावर बोलू काही' या अभिनव उपक्रमात २५०वे पुष्प 'अक्षराई' या पुस्तकावर गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विवेक उगलमुगले होते. श्री.मोमीन पुढे म्हणाले की, कवीने नेहमी सजग राहिले पाहिजे. तेव्हा उत्तम कविता निर्माण होतील. कविता ही आपले लाडके अपत्य असते, असे सांगत 'अक्षराई' कवितासंग्रहातील एकापेक्षा एक सरस कविता आणि गझल सादर करत आपल्या अनोख्या काव्यचिंतनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. माणिकराव गोडसे आणि संजय गोराडे या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande