अकोल्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचे राजीनामे!
अकोला, 22 एप्रिल (हिं.स.)। अकोल्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षश्रेष्ठींच्या कथित हुकूमशाही कारभाराला कंटाळून अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. अकोला शहरातील विविध विभाग, प्रभाग
Photo


अकोला, 22 एप्रिल (हिं.स.)। अकोल्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षश्रेष्ठींच्या कथित हुकूमशाही कारभाराला कंटाळून अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे.

अकोला शहरातील विविध विभाग, प्रभाग आणि शाखा स्तरावरील सुमारे 100 कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा सादर केला आहे.पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप करत, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी उफाळून आल्याचे सांगितले जात आहे. काही पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नेतृत्वावरही गंभीर आरोप केले आहेत.दरम्यान, या सामूहिक राजीनाम्यामुळे अकोल्यातील उबाठा शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पक्षांतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.यावेळी पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे एकमात्र असलेले आमदार नितीन देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे..

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande