नांदेड : लोह्यात १ मे रोजी 'अक्षर लेणं' साहित्य संमेलन
नांदेड, 22 एप्रिल, (हिं.स.)। स्व. रुक्मिणबाई नामदेवराव पांचाळ यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र मराठी साहित्य मंडळ व माय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोहा येथे १ मे रोजी पहिले अक्षरलेणं साहित्य संमेलन
नांदेड : लोह्यात १ मे रोजी 'अक्षर लेणं' साहित्य संमेलन


नांदेड, 22 एप्रिल, (हिं.स.)। स्व. रुक्मिणबाई नामदेवराव पांचाळ यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र मराठी साहित्य मंडळ व माय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोहा येथे १ मे रोजी पहिले अक्षरलेणं साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद नामदेवराव पवार (नगराध्यक्ष, नगर परिषद लोहा) हे असून या संमेलनात ग्रंथदिंडी, संमेलन उद्घाटन, परिसंवाद, कवी संमेलन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजक तथा मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.घ.ना. पांचाळ यांनी दिली आहे.

स्व. रुक्मिणबाई नामदेवराव पांचाळ यांच्या स्मृतीला उजाळा देता यावा यासाठी त्यांच्या पहिल्या पुण्यस्मरण दिनानिमित्त हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रल्हाद जी. लुलेकर हे संमेलनाध्यक्ष आहेत. १ मे रोजी सकाळी ८ वाजता ग्रंथ दिंडीचे उद्घाटन ह. भ. प. हनुमंतराव भालेराव गुरुजी आणि ह.भ. प. आत्माराम महाराज रायवाडीकर यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होणार आहे. सकाळी दहा वाजता साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

संमेलनाचे उद्घाटन आ. प्रतापराव पाटील चिखलीकर हे करणार आहेत. या संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून गोव्यातील पेडणेतीलउमेश गाढ, मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर , आ. विक्रम काळे, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार अॅड. बी. के. पांचाळ, ललिता गवांदे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून माजी संमेलनाध्यक्ष सुरेश लोहार कराड आणि मा. प्राचार्य रेखा दीक्षित ज्येष्ठ कवयित्री तथा माजी संमेलनाध्यक्ष कोल्हापूर हेही उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ वाजता परिसंवाद होणार असून₹ आई वडील आपल्या अस्तित्वाची खरी ओळख रहा आहे. अध्यक्षस्थानी डॉ. वैजनाथ अनमुलवाड तर कवयित्री अश्विनी दीक्षित बारामती, विनायकराव जाधव कराड राहणार आहेत. परिसंवादानंतर कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी राहणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande