अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून डिजिटल सुविधांद्वारे सक्षम उद्योजक घडविण्यास चालना
जळगाव,, 22 एप्रिल (हिं.स.) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत केवळ आर्थिक सहाय्य देण्यापुरते मर्यादित न राहता लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी Marketing Tab व डिजिटल प्रशिक्षणासारख्या आधुनिक सुविधांच
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून डिजिटल सुविधांद्वारे सक्षम उद्योजक घडविण्यास चालना


जळगाव,, 22 एप्रिल (हिं.स.) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत केवळ आर्थिक सहाय्य देण्यापुरते मर्यादित न राहता लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी Marketing Tab व डिजिटल प्रशिक्षणासारख्या आधुनिक सुविधांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. महामंडळाच्या अधिकृत पोर्टलवरील Business Promotion (Marketing Tab) द्वारे लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांची माहिती, फोटो, किंमत व संपर्क तपशील अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली असून, सध्या या प्लॅटफॉर्मवर २७,५०० हून अधिक व्यवसायांची नोंदणी करण्यात आली आहे. या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना डिजिटल बाजारपेठ उपलब्ध होत असून “लोकल ते ग्लोबल” संकल्पना राबविण्यात येत आहे. तसेच Webinar, YouTube व Podcast माध्यमातून व्यवसाय व्यवस्थापन, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक सेवा व आर्थिक नियोजन याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील उद्योजकांनाही याचा मोठा फायदा होत आहे. याशिवाय DigiLocker सेवा समाविष्ट केल्यामुळे कागदपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ व जलद झाली आहे. भविष्यात Payment Gateway तसेच MAHA-ID व UIDAI एकत्रीकरणाचीही कार्यवाही करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांमुळे लाभार्थ्यांना व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ मिळत असून, अधिकाधिक लाभार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे जिल्हा समन्वयक दिपक बोरसे यांनी प्केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande