'आधुनिक भारतासमोरील आव्हाने' पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन
पुणे, 22 एप्रिल (हिं.स.)। देशापुढील अंतर्गत सुरक्षा आणि वैचारिक संकटांवर भाष्य करणाऱ्या ''आधुनिक भारतासमोरील आव्हाने'' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या शनिवारी (२५ एप्रिल) आयोजित करण्यात आला आहे. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा वृत्तपत्रविद्या व
evm


पुणे, 22 एप्रिल (हिं.स.)। देशापुढील अंतर्गत सुरक्षा आणि वैचारिक संकटांवर भाष्य करणाऱ्या 'आधुनिक भारतासमोरील आव्हाने' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या शनिवारी (२५ एप्रिल) आयोजित करण्यात आला आहे.

आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभाग, विश्व संवाद केंद्र (पुणे) आणि भारतीय विचार साधना प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सकाळी ११ वाजता कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या दृक्श्राव्य सभागृहात पार पडणार आहे.

प्रमुख वक्ते म्हणून 'ऑर्गनायझर' साप्ताहिकाचे संपादक प्रफुल्ल केतकर उपस्थित राहणार असून, ते 'आधुनिक भारतासमोरील आव्हाने' या विषयावर मार्गदर्शन करतील.

शहरी नक्षलवाद, विघातक डावी विचारसरणी आणि मूलतत्त्ववादी इस्लाम यांसारख्या गंभीर विषयांचा उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे. या विषयातील तज्ज्ञ डॉ. पंकज जयस्वाल, रूपाली भुसारी, सागर शिंदे आणि योगेश्वर घोगले यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. सद्यस्थितीत देशासमोर उभ्या ठाकलेल्या वैचारिक आणि सामाजिक आव्हानांचे विश्लेषण या ग्रंथातून मांडण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande