
चंद्रपूर, 22 एप्रिल (हिं.स.)। गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानव दर्शन अध्यासन केंद्राच्या वतीने एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सव तथा निबंध, पुस्तक परीक्षण व रिल्स स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गुरूवार, 23 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजता विद्यापीठच्या जुने सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे असणार आहे. प्रमुख वक्ता म्हणून सन्मित्र सैनिकी विद्यालयाच्या प्राचार्य तथा भारतीय शिक्षण मंडळाच्या विद्यालय शिक्षा गतिविधी विभागाच्या अखिल भारतीय प्रमुख अरूंधती कावडकर, तर प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉ. प्रिया गेडाम, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. श्याम खंडारे, सिनेट सदस्य तथा पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानव दर्शन अध्यासन प्रस्तावक संजय रामगिरवार, समन्वयक डॉ. अनुरूध्द गचके यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव