लातूर : पाण्यासाठी नागरिकांचे ठिय्या आंदोलन
लातूर, 22 एप्रिल, (हिं.स.)। किल्लारी येथे पाण्याचा प्रश्न अनेक भेडसावत आहे. नळाद्वारे पाण्याचा पुरवठा सुरळीतपणे करण्यात यावा, यासह अन्य विविध मागण्यासाठी नागरिकांच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सध्या वर्षातून एकदा कि
ठिय्या आंदोलन


लातूर, 22 एप्रिल, (हिं.स.)। किल्लारी येथे पाण्याचा प्रश्न अनेक भेडसावत आहे. नळाद्वारे पाण्याचा पुरवठा सुरळीतपणे करण्यात यावा, यासह अन्य विविध मागण्यासाठी नागरिकांच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सध्या वर्षातून एकदा किंवा दोनदाच नळाद्वारे पाणी दिले जाते. ग्रामपंचायत पाणीपट्टी, घरपट्टी कोटी रुपयांपर्यंत वसूल करते. कोट्यवधी

रुपयांचा निधी शासनाकडून येत असतो. या निधीचा विनियोग व्यवस्थीतपणे व्हायला हवा, नळाद्वारे पाणी सोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर लागलीच पाईपलाईन फुटते किंवा लाईट बिल थकल्यामुळे कनेक्शन कट होत असते.

गावातील रस्त्याचे डांबरीकरण, सिमेंटीकरण नाही. जी काही कामे झाली ती निकृष्ट कामामुळे नष्ट झाली आहेत. ३० वर्षापासून नाली सफाई नाही परंतु मात्र त्यावर खर्च मात्र दाखविण्यात येतो. नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात विनायक हनुमंत बिराजदार, बाबुराव झाकडे, आठवले गटाचे आंकुश कांबळे, मोहन गायकवाड, विलास कुलकर्णी, सुभास भोसले, तानाजी दंडवले, यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी मंडळ अधिकारी सुरेश गवळी, तलाठी चव्हाण, ग्रामविकास अधिकारी अमित कुमार रोकडे यांना निवेदन दिले.

यावेळी ग्रामविकास अधिकारी रोकडे अमितकुमार यांना नागरिकांनी धारेवर धरीत अनेक प्रश्न विचारले. ग्रामविकास अधिकारी रोकडे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनास सरपंच, उपसरपंच किंवा कोणताही ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नव्हते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande